Pune: हेअर ट्रान्सप्लांटच्या नावाखाली 300 जणांना लावली लाखोंची शेंडी; बोगस डॉक्टरचा कांड वाचून बसेल धक्का

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ डिसेंबर । पुण्यातील विमाननगर परिसरात सुरू असलेला बोगस हेअर ट्रान्सप्लांट रॅकेटचा (hair transplant racket) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात आरोपींनी हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या नावाखाली तब्बल 300 जणांची लाखोंची फसवणूक (Money fraud with 300 people) केली आहे. संबंधित ठिकाणावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोगस डॉक्टरसह तिघांना बेड्या ठोकल्या (3 arrested) आहेत. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह असं अटक केलल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. तर संबंधित रुग्णालयात परिचारीका म्हणून काम करणाऱ्या पंचशीला काशिनाथ आणि रोडगे आणि चैताली भरत म्हस्के अशी अटक कलेल्या महिलांची नावं आहेत. या प्रकरणी महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांनी विमानतळ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने तिघांना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिन्ही आरोपी सध्या विमानतळ पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरातील दत्त मंदिर चौकात हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट अँड अस्थेटिक स्टुडिओ नावाचं रुग्णालय आहे. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींना आपल्या जाळ्यात ओढत होते.

हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या नावाखाली त्यांची आर्थिक फसवणूक करायचे. भूल देण्याचं कोणतंही ज्ञान नसताना आरोपी ग्राहकाचं हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्यांना भूल द्यायचे. बोगस डॉक्टरकडील रेकॉर्ड्सची तपासणी केली असता, त्यांनी आतापर्यंत तीनशेहून अधिक जणांवर हेअर ट्रीटमेंट केल्याचं आढळून आलं आहे. आरोपींनी बहुतांश ग्राहकांकडून रोख रक्कम स्विकारली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *