महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ डिसेंबर । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना पुण्यात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६०९० रुपये आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार ३०० रु ने कमी होऊन ६१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार पुण्यामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६०९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर पुण्यात २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,३२० प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६५१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५१० रुपये . चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१२ रुपये आहे. चांदीत कालच्या आणि आजच्या दरामध्ये ३ रु फरक आहे .