कोरोनाचा बुस्टर डोस देण्याबाबत आज होणार निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० डिसेंबर । Omicron variant : भारतात कोरोनाचा बुस्टर डोस देण्याबाबत आज निर्णय होणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची महत्वाची बैठक होत आहे. यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिरमकडून (Serum Institute of India) कोविशिल्डच्या (Covishield) बुस्टर डोससाठी (booster dose) विचारणा करण्यात आली आहे.

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. 20 पेक्षा जास्त रुग्ण देशात आढळून आले आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारतात बुस्टर डोस देण्याबाबत आज महत्वाची बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. केंद्रीय औषध मानक संस्थेच्या एक्सपर्ट कमिटीची बैठक होत आहे. दरम्यान, या बैठकीत बुस्टर डोस देण्याबाबत एकमत होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

सिरमकडून कोविशिल्डच्या बुस्टर डोससाठी विचारणा करण्यात आली असून बुस्टर डोससाठी ‘डीसीजीआय’कडे सिरमचं निवेदन दिले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने DCGI कडून Covishield साठी बूस्टर डोस म्हणून मान्यता मागितली आहे. कारण देशात त्याचा पुरेसा साठा आहे आणि नवीन प्रकार उदयास आल्याने बूस्टर शॉटची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *