![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० डिसेंबर । पेट्रोल भरण्याआधी जाणून घ्या आज काय दराने इंधनाची विक्री होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Fuel Price on 10th December) जारी केले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अर्थात पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. मात्र जरी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नसले तरीही आजचे दर सामान्यांच्या खिशाला चाप बसवणारेच आहेत.मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत.
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात इंधनाच्या दरांमध्येमोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Today) स्थिर आहेत. आज 10 डिसेंबर रोजी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली आहे कारण केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील वॅटमध्ये कपात (Kejriwal Government slashes vat on petrol) करण्यााच निर्णय घेतला. परिणामी दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीमध्ये 1 लीटर पेट्रोलचा भाव 95.41 रुपये प्रति लीटर आहे.
दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते
आजचे इंधनाचे दर
शहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)
दिल्ली 95.41 रुपये 86.67 रुपये
मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
चेन्नई 101.40 रुपये 91.43 रुपये
कोलकाता 104.67 रुपये 89.79 रुपये