एमआयएमच्या औरंगाबाद-मुंबई रॅलीवरून वाद, अहमदनगर सीमेवर पोलिसांसोबत झाली खडाजंगी !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्डाशी संबंधित जमीन आणि इतर काही मागण्यांसाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे रॅली काढून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. या रॅलीला परवानगी नसल्याचं म्हणत त्यांना अहमदनगर-औरंगाबाद सीमेजवळ अहमदनगर पोलिसांनी अडवण्यात आलं होतं. पोलिसांनी अडवल्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन केले होते. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचं कारण पोलिसांनी दिलं होतं. “कुणालाही त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही, आम्ही आमचं एक मिशन घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालो आहोत,” अशी प्रतिक्रिया खासदार जलील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

राज्य सरकारकडून आमची रॅली रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप जलील यांनी केला. शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना अडचणी येणार नाहीत, अशा पद्धतीने रॅली काढत पुढे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे, असं खासदार जलील यांनी सांगितलं.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, अशा पद्धतीने नियमांचं पालन करण्याच्या अटीवर काही गाड्यांना मुंबईला जाण्यास परवानगी दिल्याची माहिती पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी एबीपीशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *