महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ डिसेंबर । पावसामुळे दोन आठवड्यांपुर्वी थंडी वाढली होती. परंतु, मध्यंतरी थंडी काहीसी कमी झाली होती. मात्र धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला असून ११.५ अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. (dhule-news-Mercury-dropped-again-in-Dhule)
धुळे जिल्ह्यामध्ये आज तापमानाचा पारा पुन्हा घसरल्याचे दिसून येत आहे. ११.५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची आज धुळ्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. यंदा धुळ्यातील तापमान यापुर्वी ८ अंशापर्यंत खाली गेले होते. यानंतर तापमान वाढले होते. मात्र पुन्हा तापमान खाली येवू लागले होते.
हवेत आर्द्रता वाढल्याने वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून यामुळे धुळेकर चांगलेच गारठले आहेत. घराबाहेर पडताना धुळेकरांना स्वेटर, टोपी अशा गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. यापुढे देखील अशाच पद्धतीने तापमानाचा पारा आणखीन घसरण्याची दाट शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.