महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ डिसेंबर । दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट असलेल्या ‘ओमायक्रॉन’च्या रुग्ण संख्येत दिवसागणित वाढ होताना दिसत आहे. अशातच एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनमुळे रुग्णाचा मृत्यू ची ही पहिलीच घटना आहे. या बातमीला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही दुजोरा दिला आहे.
ब्रिटनमध्ये झपाट्याने ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत 1500 हुन अधिक लोकांना याची लागण झाली आहे. ओमायक्रॉनचे संकट पाहता ब्रिटन सरकारने 30 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना बुस्टर डोस (कोरोना लसीचा तिसरा डोस) देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुकिंग देखील सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी लंडनमध्ये एका लसीकरण केंद्राचा दौरा करताना सांगितलं आहे की, ”देशात आता ओमायक्रॉनचे रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. बरेच रुग्ण आता रुग्णालयात दाखल होत आहेत.”