दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक उद्या होणार जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ डिसेंबर । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Education Board) पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे (SSC And HSC written test) वेळापत्रक मंगळवारी, 14 डिसेंबर रोजी जाहीर (timetable announcement) केले जाणार आहेत. यासाठी आज शालेय शिक्षण विभागाकडून (School education department) शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक मागील तीन आठवड्यापासून मंत्रालयात मंजुरीविना पडून आहे. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये मोठ्याप्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर राज्यभरात चर्चा सुरू झाल्याने आज या वेळापत्रकावर महत्वाची बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्यानुसार दहावी बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी आणि त्याचे नियोजन करता यावे म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून मागील काही वर्षात हे संभाव्य वेळापत्रक जून ते ऑगस्ट दरम्यान आज जाहीर केले जात होते. मात्र यंदा खूप उशीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये याविषयी नाराजी पसरली आहे. दुसरीकडे शिक्षण मंडळाने हे वेळापत्रक मागील तीन आठवड्यापूर्वीच मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवले असून त्यावर कोणताच निर्णय झाला नसल्याने मंडळानेही यावर बघ्याची भूमिका घेतली होती.

मात्र विद्यार्थी आणि शाळांचा दबाव वाढल्याने मंडळाकडून हे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जावे, अशी विनंती करणारे पत्र पुन्हा एकदा पाठवले असल्याने लांबणीवर पडले दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मंगळवारी दुपारी जाहीर केले जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याकडून देण्यात आली.

शाळांचा आढावा घेतला जाणार

दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यासोबत मंगळवारी शालेय शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये राज्यात मुंबई, पुणे आदी शहरांचा अपवाद वगळता राज्यभरात पहिलीपासून सुरू झालेल्या शाळांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटमुळे पालकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि त्याविषयी काही तज्ञांच्या मते हे जाणून घेतले जाणार आहेत. यासोबतच राज्य हिवाळी अधिवेशन लवकर सुरू होणार असल्याने या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे विषय आणण्याची तयारीही या बैठकीत केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *