वायरलेस चार्जर १६ मार्चला लाँच होणार ; शाओमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- : नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी केवळ स्मार्टफोन लाँच करीत नाही तर स्मार्ट उत्पादने सुद्धा लाँच करीत आहे. शाओमी येत्या १६ मार्च रोजी असेच एक उत्पादन लाँच करणार आहे. शाओमीकडून वायरलेस चार्जर किंवा वायरलेस पॉवर बँक लाँच करण्याची शक्यता आहे. शाओमी कंपनीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून यात स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे शाओमी चाहत्यांच्या नजरा आता १६ मार्चकडे लागल्या आहेत.

शाओमीने आपल्या एका छोट्याशा व्हिडिओसोबत #CutTheCord हा हॅशटॅग वापरला आहे. या उत्पादनाची लाँच तारीख १६ मार्च सांगितली आहे. या व्हिडिओतून जास्त खुलासा करण्यात आला नसला तरी कंपनी वायरलेस चार्जिंग सपोर्ट करण्यासाठी फोनसाठी एक वायरलेस चार्जर किंवा पॉवर बँक लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पोस्टमध्ये शाओमीने लिहिलेय, आता सांभाळून ठेवण्यासाठी वायरची गरज भासणार नाही. एमआय चाहत्यांसाठी आता वेळ आलीय की, #CutTheCord (वायरची गरज नाही) विना वायरचे उत्पादन सांभाळण्याची.

शाओमीचे १६ मार्चला लाँच होणारे उत्पादन हे वायरलेस चार्जर असू शकते. शाओमीचा हा व्हिडिओ ६ सेकंदचा शॉर्ट आहे. या व्हिडिओत एक चार्जिंग सिम्बॉल आहे. ज्यात चारी बाजुनी एक वर्तूळ असून त्यात डॉट आहेत. ते चमकताना दिसत आहेत. त्यामुळे यावरून स्पष्ट होते हे उत्पादन चार्जिंगशी संबंधित आहे. शाओमीचे इंडिया अध्यक्ष मनू कुमार जैन यांनीही ट्विट केले आहे. शाओमीने याआधी एक वायरलेस फास्ट चार्जरचा एक टीझर जारी केला होता. तो ४० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *