आधीच देश करोना ने हैराण आता बर्ड फ्लू, स्वाइन फ्लूचा कहर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ नवी दिल्ली, : भारतात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. उत्तर प्रदेशात गेल्या महिनाभरापासून बर्ड फ्लूबाबत संकेत मिळत आहेत. वाराणसीमध्ये दीड महिन्यात पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची प्रकरणं आहेत. यापैकी काही पक्ष्यांना बर्ड फ्लू असल्याचं निदान झालं. तर मेरठमध्ये स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण दिसून आलेत. जानेवारीपासून 81 रुग्ण आढळळेत, तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लखनौमध्ये जवळपास 50 प्रकरणं आहेत.
बिहारमध्येही बर्ड फ्लू असण्याची शक्यता, स्वाईन फ्लूचे रुग्णकेंद्र आणि राज्य सरकार कोरोनाव्हायरसशी दोन हात करत असतानाच आता सरकारसमोर आणखी 2 संकटं उभी राहिली. कोविड-19 (COVID-19) सह आता बर्ड फ्लू (H5N1 Virus – Bird flu) आणि स्वाईन फ्लू (H1N1 Virus – swine flu) चं आव्हान आहे. काही राज्यांमध्ये या आजारांची प्रकरणं समोर आलीत.

देशात कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्येच आढळला होता आणि या केरळमध्ये आता बर्ड फ्लूचेही रुग्ण आढळलेत. केरळच्या परप्पनंगडी, कोझिकोडमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणं दिसून आलीत. यानंतर केरळ सरकारने शनिवारी कोंबड्यांना मारण्याचा आदेश दिलेत. एएनआयने याबाबत ट्विट केलं आहे.
केरळमध्ये कोरोनाव्हायरसचे आतापर्यंत 19 रुग्ण आहेत. भारतात सर्वात आधी कोरोनाव्हायरसचा रुग्ण केरळमध्येच होते.
केरळशिवाय उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही या आजारांचा धोका वाढला आहे, दैनिक जागरणनं याबाबत वृत्त दिलं आहे.

जानेवारीच्या अखेरीस बिहारमध्ये बर्ड फ्लूने डोकं वर काढल्याची शक्यता दिसन आलं. पटनामध्ये कावळ्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, मात्र स्थानिक प्रशासनाने परिसरात अलर्ट जारी करून सर्व पोल्ट्री फार्मवर तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
बिहारमध्ये 8 दिवसांत स्वाईन फ्लूचे 6 रुग्ण आढळलेत. सुरुवातीला पटना आणि त्यानंतर शास्त्रीनगर, रामकृष्ण नगर, गया घाट, मच्छरहट्टामध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण समोर आलेत.
पश्चिम बंगालमध्ये 13 स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत. त्यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. अजून काही संशयित रुग्णांची तपासणी सुरू आहे.
भारतात शनिवारपर्यंत कोरोनाव्हायरसचे एकूण 84 रुग्ण आहेत. त्यापैकी 10 रुग्ण बरे झालेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. देशातील 13 राज्यांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. देशात कोरोनाव्हायरसला आपत्ती घोषित करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *