इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताय? उद्भवणाऱ्या या समस्यांवर करा विचार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ डिसेंबर । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle) खरेदी करावं अशी अनेकांची इच्छा होते. यामुळेच मोठ्या प्रमाणात या वाहनांची खरेदी होताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनं खरेदी केल्याने केवळ पैशांचीच बचत (Save money) होत नाही, तर पर्यावरणासाठीही चांगले मानले जाते. कारण, या गाड्यांमुळे वायू प्रदूषण होत नाही. परंतु, इलेक्ट्रिक वाहनं खरेदी केल्यानंतर अनेक समस्याही येतात. याची आपल्याला माहिती असायला हवी.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या म्हणून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे गरजेचे नाही. तसेच दुसरा घेतो म्हणून आपणही इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले पाहिजे असेही नाही. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामागचा उद्देश अगोदर समजून घेतला पाहिजे. आपली गरज आणि वापरानुसार ही गाडी घेण्याला प्राधान्य दिले पाहिजे. अन्यथा पुढील समस्यांना सामना करावा लागू शकतो.

पायाभूत सुविधा अजून विकसित नाही

सार्वजनिक इलेक्ट्रिक बॅटरी चार्जिंगची (Battery charging) पायाभूत सुविधा भारतात अजून विकसित झालेली नाही. तुम्ही घरून कार चार्ज केल्यानंतर राईडला गेलात तर गाडीच्या श्रेणीनुसार मर्यादित अंतरापर्यंतच प्रवास करू शकाल. कारण, वाहन वारंवार चार्ज करावे लागते. जवळपास कोणतेही चार्जिंग पॉइंट नसल्यास तुमची अडचण होऊ शकते.

वाहनाची श्रेणी

अनेक इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांसाठी वाहनाची श्रेणी (Vehicle range) निश्चितच चिंतेचा विषय राहिली आहे. तुम्ही कारणे घरातून बाहेर पडता तेव्हा ठरावीक अंतराचा प्रवास केल्यानंतर चार्ज करावे लागते. अशावेळी जवळपास कोणतेही चार्जिंग स्टेशन नसेल तर तुम्हाला गाडी टो करावी लागेल.

EV सर्व्हिस स्टेशन

पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (Electric vehicle) कमी पार्ट असतात. परंतु, बॅटरीमुळे शॉर्टसर्किट आणि इतर प्रकारचे तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जवळपास कोणतेही EV सर्व्हिस स्टेशन (Service station) नसल्यास मेकॅनिकला घरी बोलावावे लागेल आणि मेकॅनिक घरी येईपर्यंत, समस्येचे निराकरण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्व्हिस स्टेशनची कमतरता ही ईव्ही कार मालकांसाठी मोठी चिंतेची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *