WhatsApp Tips : मेसेज पाठवताना Typing… लपवायचय? करा ही सेटिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । व्हॉट्सॲप काय आहे हे आता कोणालाही सांगायची गरज नाही. कारण, स्मार्टफोन वापरणारा याचा वापर करीत असतो. जगभरात दोन अब्जाहून अधिक वापरकर्ते व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरतात. या ॲपने मेसेजिंगला नवे रूप दिले आहे. यामुळेच बरेच वापरकर्ते त्वरित संदेश पाठवण्यासाठी इतर कोणत्याही ॲपपेक्षा व्हॉट्सॲप वापरतात. आज आम्ही तुम्हाला टायपिंग मेसेज (message) पाठवताना समोरच्याला तुम्ही काही लिहीत आहात हे न दिसावे म्हणून टिप्स (tips and tricks) सांगणार आहोत…

आपण एखाद्या मित्राशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी चॅट करतो तेव्हा त्याला आपण काहीतरी टायपिंग करीत असल्याचे दिसते. मात्र, सेटिंगमध्ये काही बदल करून आपण हे लपवू शकतो. तुम्ही या ट्रिकचा वापर केला तर मेसेज पाठवताना समोरच्याला तुमचे टाइपिंग (Typing) स्टेटस दिसणार नाही. व्हॉट्सॲपमध्ये असे इनबिल्ट फीचर नसले तरी, असे करण्यास मदत करते. यासाठी एक ट्रिक फॉलो करावी लागेल. चला तर जाणून घेऊ या याविषयी…

यानुसार करा व्हॉट्सॲपमध्ये सेटिंग

  • प्रथम तुमचे व्हॉट्सॲप (WhatsApp) खाते उघडा
  • यानंतर ज्याला मेसेज पाठवायचा आहे त्याची प्रोफाईल निवडा
  • आता मोबाईल डेटा बंद करा आणि मेसेज पाठवण्यापूर्वी एअरप्लेन मोड चालू करा
  • यानंतर बॉक्समध्ये संदेश टाइप करा आणि पाठवा
  • डेटा बंद आणि फ्लाइट मोड चालू असल्याने संदेश पाठवला जाणार नाही
  • आता मेसेजच्या पुढे घड्याळाचा पर्याय दिसेल
  • आता फ्लाइट मोड बंद आणि मोबाईल डेटा चालू करा
  • मोबाईल डेटा चालू करताच मेसेज संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचेल
  • अस केल्याने तुम्ही टायपिंग (Typing) करीत आहात, असे समोरच्याला दिसणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *