महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ डिसेंबर । सद्या इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric vehicle) मागणी चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई म्हणा किंवा पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती… जसं जसा काळ बदलत चालला तसं तसे बदल होत चालले आहे. आता हे बदल वाहनांसाठीही लागू झाले आहेत. पूर्वी पेट्रोल आणि डिझेल अशा दोनच इंधनावर चालणाऱ्या गाड्या होत्या. मात्र, आता इलेक्ट्रिक गाडीने नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. इलेक्ट्रिक वाहनांमधून प्रदूषण होत नसल्याने अनेकजण इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सकडे (Electric vehicle) वळत आहेत. मात्र, भारतात इलेक्ट्रिक वाहनांना लायसेन्सची (License) गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर आपण आज जाणून घेऊ या…
इलेक्ट्रिक गाड्यांना लायसेन्सची गरज नाही. इलेक्ट्रिक म्हणजे बॅटरीवर चालणारी वाहने चालवताना कुठल्याही लायसेन्स, इन्शुरन्स, कागदपत्रे आणि हेल्मेटचीही गरज पडत नाही. मात्र, या मागचं कारण काय? इतर वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना सूट का? अशा प्रश्नांची उत्तर आम्ही देणार आहोत. कारण, इलेक्ट्रिक वाहनंच वाहतुकीच्या प्रमुख साधनांचे भविष्य असणार आहेत.