महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ डिसेंबर । जगात अनेक प्रकारची फळं आहेत आणि त्या सर्वांच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. साधारणतः फळांची किंमत 400 ते 500 रुपयांपर्यंत असते, परंतु लोकांना ती महागच वाटते.जगात अनेक प्रकारची फळं आहेत आणि त्या सर्वांच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. साधारणतः फळांची किंमत 400 ते 500 रुपयांपर्यंत असते, परंतु लोकांना ती महागच वाटते. जगाशिवाय, भारतातही अनेक प्रकारची फळं आणि भाज्या आढळतात. सफरचंद (Apples), द्राक्षे, डाळिंब, संत्री, आंबा (Mango), लिची ही सर्वांनी खाल्ली असेल; पण एका फळाला किलोमागं लाखो रुपये मिळालं, तर काय करणार? खरेदी तर दूरच सामान्य माणूस स्वप्नातही पाहू शकत नाही.
जगात अशी अनेक फळं आहेत, ज्यांची किंमत ऐकून होश उडून जातील. होय, जपानमध्ये एक असं फळ आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये मोजली जाते. हे फळ खरेदी करण्याचा विचारही सामान्य माणूस करू शकत नाही. चला जाणून घेऊया, या महागड्या फळाबद्दल आणि त्याची किंमत. शेवटी, या फळात असं काय आहे की, ते इतकं महागडं विकलं जातं.
काही लोकांमध्ये वेगवेगळी फळं खाण्याची क्रेझ स्पष्टपणे दिसून येते. या फळांची किंमत 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत असू शकते. पण, ज्या फळाबद्दल आम्ही सांगणार आहात, त्याची किंमत लाखो रुपये आहे. आता तुम्ही विचार करत असाल, की असं कोणतं फळ आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे. होय, ते अगदी खरंय. जपानमध्ये या फळाचा नुकताच लिलाव करण्यात आला.
जगातील महागड्या फळांमध्ये समाविष्ट असलेल्या या फळाचं नाव युबरी खरबूज (Melon) आहे. जपानमध्ये या फळाची लागवड करून तिथं विक्री केली जाते. या फळाची फारच कमी निर्यात होते. हे सूर्यप्रकाशात नाही, तर ग्रीनहाऊसमध्ये घेतलं जातं.
जपानमध्ये (Japan) सापडलेल्या युबरी कस्तुरी खरबूजाची किंमत 1 दशलक्ष आहे, तर दोन खरबूज 20 लाख रुपयांना मिळतात. 2019 मध्ये या खरबुजांचा 33,00,000 रुपयांना लिलाव झाला होता. आतून केशरी दिसणारं हे फळ खूपचं गोड असतं.