काल दिवसभरात 6 हजार 358 नव्या कोरोनाबाधितांची, तर 653 ओमिक्रॉनबाधितांची नोंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ डिसेंबर । जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने देशाची चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात देशात 6 हजार 358 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 293 बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 653 रुग्ण आढळून आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 75 हजार 456 आहे. तर कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 80 हजार 290 वर पोहोचली आहे. तर काल 64501 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत एकूण 3 कोटी 42 लाख 43 हजार 945 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात काल दिवसभरात 1426 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 776 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 3 हजार 733 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के आहे. राज्यात काल 26 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 167 ओमिक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 72 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहे.

काल राज्यात 21 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 10 हजार 441 बाधितांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 91 हजार 464 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत, तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,85,49,133 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *