इंग्लंडची जिरवली ; तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि १४ धावांनी जिंकली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ डिसेंबर । ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटी एक डाव आणि १४ धावांनी जिंकली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला आणि सामन्यासह मालिका देखील स्वत:च्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात सहा विकेट घेत धमाकेदार विजय साकारला. अ‍ॅसेश मालिकेत इंग्लंडने पहिल्या कसोटीपासून निराश कामगिरी केली.

इंग्लंडचा पहिला डाव फक्त १८५ धावांत संपुष्टात आला आणि तेथेच इंग्लंडचा पराभव निश्चित झाला होता. उत्तरा दाखल ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६७ धावा केल्या. इंग्लंड दुसऱ्या डावात कमबॅक करले असे वाटत होते, पण त्यांचा डाव फक्त ६८ धावात संपुष्टात आला. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून फक्त दोघा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. कर्णधार जो रूटने सर्वाधिक २८ तर बेन स्ट्रोक्सने ११ धावा केल्या. इंग्लंडच्या तिघा फलंदाजांना भोपळा देखील फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात स्कॉट बोलॅडने धमाकेदार कामगिरी केली. त्याने सहा विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलिया संघाने अ‍ॅसेश २०२१ची सुरूवात धमाकेदार केली होती. तिसऱ्या कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिका देखील ३-०ने जिंकली.

अ‍ॅसेश २०२१ मधील आतापर्यंतचा निकाल

>पहिली कसोटी- ऑस्ट्रेलियाचा ९ विकेटनी विजय
>दुसरी कसोटी- ऑस्ट्रेलियाचा २७५ धावांनी विजय
>तिसरी कसोटी- ऑस्ट्रेलियाचा १ डाव आणि १४ धावांनी विजय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *