5-जी नेटवर्क लवकरच देशातील मोठ्या शहरांमध्ये सुरू होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ डिसेंबर । दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले 5-जी नेटवर्क लवकरच मुंबईसह देशातील मोठ्या शहरांमध्ये सुरू केले जाणार आहे. टेलिकॉन कंपन्यांकडून गेल्या दोन वर्षांपासून 5-जी बाबत देशभर चाचण्या सुरू असून त्या नव्या वर्षात मेअखेर पूर्ण होणार आहेत. त्यानंतर ग्राहकांना व्यावसायिक स्तरावर नेटवर्क उपलब्ध होणार आहे.

देशात सध्या सहजपणे 5-जी चे मोबाईल हॅण्डसेट उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना 5-जी नेटवर्क कधी सुरू होणार याची प्रतिक्षा आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने दूरसंचार विभागाच्या अहवालाचा हवाला देत मुंबई, गुरुग्राम, बंगळूरु, दिल्ली, अहमदबाद, हैदराबाद, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार असल्याचे दूरसंचार विभागाकडून स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांना वेगवान कनेक्टिविटीचा आनंद लुटता येणार आहे.

5-जी नेटवर्कच्या चाचण्यांमध्ये वोडाफोन-आयडिया, जिओ, एअरटेल या तीन कंपन्या देशभर 5-जी च्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र या कनेक्टिवीटीची किंमत किती असेल हे पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱया 5-जी स्पेक्ट्रम लिलावानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *