औरंगाबाद जिल्ह्यात गारांचा पाऊस ; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ डिसेंबर । मराठवाड्यात पुढील काही दिवसात पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळालं. तर वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव या ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार, गोळेगाव,शिवना येथे रिमझिम पाऊस बरसत होता तर, वैजापूरच्या चेडुफळ येथे गारांचा पाऊस पडला आहे. तसेच जिल्हाभरात ढगाळ वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मध्य भारताच्या काही पट्टामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालामुळे काही भागात गारांसह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार, २८ डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर, २७ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता.

कडाक्याच्या थंडी नंतर मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाचे संकेताने जिल्ह्यात शेतकऱ्यांना धडकी भरली गेली आहे. हल्ली जिल्ह्यात शेतकर्‍यांची धान कापून शेतात ठेवलेला आहे. ह्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतात कापुन ठेवलेला आणि उघड़यावर असलेला धान पिकाला नुकसान होण्याची शक्यता तर आहेच. सोबतच वातावरणाच्या बदलामुळे साथिचे रोग डोके वर काढन्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विदर्भातही गारपीट

मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातही गारपीट झाली आहे. भंडारा व अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *