GST Council: सामान्यांना दिलासा! कपड्यांवरील जीएसटीमध्ये वाढ नाही, जीएसटी परिषदेचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ डिसेंबर । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेत कपड्यांवरील जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेने कपड्यांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यावर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. अनेक राज्यांनी आणि टेक्सटाईल यूनियनने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती.

जीएसची परिषदेने निर्णय घेतला होता की, 1 जानेवारी 2022 पासून पाच टक्केवरुन वाढवून 12 टक्के करण्यात आला होता. परंतु अनेक राज्यांनी आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीचा जीएसटी दर वाढव्यास विरोध होता. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर वाढवण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली आणि हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.दरम्यान केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्वीट करत या निर्णयाची माहिती दिली आहे.

सरकारच्या जीएसटीचे दर वाढवण्याच्या या निर्णायावर क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CMAI) यांनी नाराजी व्यक्त केली होती. याचा कापड उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ आणि मालवाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे या उद्योगाला आधीच अडथळे येत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे होते.

सध्या जीएसटी दराचे चार स्थर आहेत. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के. जीएसटीच्या 12 टक्के आणि 18 टक्के स्थराला एकत्र करण्याची मागणी होत आहे. तर राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी कपड्यांवरील जीएसटी 5 टक्क्यावरून 12 टक्क्यांवर करण्याच्या निर्णयाला विरोध केला त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *