राज्यात या ठिकाणी पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय, किती तारखेपर्यंत बंद राहणार शाळा? वाचा सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जानेवारी । वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये मुंबईतील (Mumbai) शाळांबाबत अखेर निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा (1st to 8th Standard School offline classes) बंद करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत (31st January) पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत शाळा बंद निर्णय!
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन (Online) शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन (Offline) वर्ग बंद राहणार आहेत.

आजच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचाही आढावा घेतला होता. आजपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. एकीकडे आता मुंबईत शाळांबाबत जो निर्णय घेण्यात आला आहे, तशाप्रकारचा निर्णय राज्यातील इतरही जिल्ह्यांतील शाळांबाबत घेतला जातो का, याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *