राज्यात सक्रिय रुग्णांची झपाट्याने वाढ; 40 हजारांचा टप्पा पार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .3 जानेवारी । राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा (Corona active patients) वेगाने वाढत असून 42,024 वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांमध्ये (patients increases) 91.36 टक्के वाढ झाली आहे. त्यातील 38 टक्के बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 16,380 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे 26,112 (62.1%) रुग्ण आहेत. 5450 (12.58 %) रुग्ण गंभीर आहेत. (corona active patients increases speedily in Maharashtra more than forty thousand patients found)

गंभीर रुग्ण वाढल्याने आयसीयूमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आयसीयू मध्ये 5.61 टक्के म्हणजे साधारणता 2365 रुग्णांना आयसीयू ची गरज भासली आहे. सक्रिय रुग्णांपैकी व्हेंटिलेटरवर 2.35 टक्के म्हणजेच 990 रुग्ण तर ऑक्सिजन वर 3.26 टक्के म्हणजे साधारणता1375 रुग्ण आहेत. तर 7.9 टक्के म्हणजेच 2980 रुग्ण आयसीयू बाहेर ऑक्सिजन वर आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले क्षेत्र

मुंबई – 29,819

ठाणे – 4669

पुणे – 3274

पालघर – 806

रायगड – 746

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *