आयफोनचे हे तीन मॉडेल्स होणार बंद, ग्राहकांना बसू शकतो धक्का

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .3 जानेवारी । आयफोनच्या वापरकर्त्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. आयफोनची निर्माता कंपनी अॅपलने काही फोन मॉडेल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही युजर्सना धक्का बसू शकतो.या मॉडेल्समध्ये iPhone SE, iPhone 6s, iPhone 6s Plus यांचा समावेश आहे. हे मॉडेल्सची लोकप्रियता बरीच आहे आणि लाखो वापरकर्ते अजूनही ही मॉडेल्स वापरत आहेत. iPhone 6 हे मॉडेल मात्र यात समाविष्ट करण्यात आलेलं नाही. कारण, 2023 पर्यंत हे मॉडेल राखीव ठेवण्यात आलं आहे.

या मॉडेल्सची लोकप्रियता प्रचंड असल्याने कंपनी लगेचच ती बंद करणार नाही. या मॉडेल्सना कमीत कमी दोन वर्षांपर्यंत विंटेज मॉडेल्समध्ये समाविष्ट करण्यात येईल. विंटेज मॉडेल्स म्हणजे, अशा प्रकारचे फोन्स ज्यांचं उत्पादन मर्यादित स्वरूपात करण्यात येतं. अशा प्रकारच्या फोन्सना सिक्युरिटी अपडेट्स किंवा ओएस अपडेट दिलं जात नाही.

 

अशा विंटेज मॉडेल्सचे तांत्रिक पार्ट मिळत नाहीत. तसंच, या फोनमध्ये कोणतेही सिक्युरिटी अपडेट किंवा ओएस अपडेट येत नाहीत. त्यामुळे तिथे येणाऱ्या तांत्रिक अपडेट्स मिळत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *