महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ जानेवारी । मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. यामुळे तातडीची पावलं उचलण्याची आवश्यकता असून कठोर निर्बंध (Strict restrictions) लावण्यात येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, टास्क फोर्स आणि इतर अधिकाऱ्यांची एक बैठक सकाळी 9 वाजता पार पडणार आहे. या बैठकीत निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होईल. (Strict restrictions may impose in Maharashtra)
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यामुळे राज्यात आता कठोर निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्याचीही चर्चा होत आहे. कोरोना बाधितांच्या आकडेवारीला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळीच निर्बंध लावणं आवश्यक आहे. त्याच संदर्भात सकाळी नऊ वाजता मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत इतर मंत्री, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आज होणाऱ्या बैठकीत कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेच्या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच या कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील.