महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । कोरोना रुग्णांची संख्या दोन ते तीन दिवसांत दुप्पट होतेय… विद्यार्थी कोरोनाचा कचाट्यात सापडू नये म्हणून राज्यभरातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसंच मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबादसह ९ जिल्ह्यातील पहिले ते नववीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतलाय. मात्र ग्रामीण पट्ट्यातील शाळांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही… शहरांप्रमाणेच ग्रामीम भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. अशातच मुलांना शाळेत पाठवायचं की नाही असा संभ्रमावस्थेत पालक सापडलेत.