पर्यटकांना आजपासून ताडोबात वाघोबाचे दर्शन मिळणार नाही ? कारण काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .७ जानेवारी । कोरोनानं आपलं हातपाय चांगलेच पसरले. शहरातच नव्हे तर जंगलातही आता कोरोना शिरला. वाघाला भेटायला जायचं ठरवलं तरी आता कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणं आवश्यक झालंय. दोन्ही डोस चौदा दिवसांअगोदर घेतलेले असावेत. वैद्यकीय कारणाने लस घेतली नसेल तर त्यासाठी तसे प्रमाणपत्र हवे.

आजपासून ताडोबात नवे नियम
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जायचं असेल तर लसीकरण करणं आवश्यक आहे. कोरोनाचा प्रकोप पाहता हे नवे दिशानिर्देश प्रशासनानं जारी केलेत. दोन्ही डोस घेतलेल्यांनाच ताडोबाच्या कोर आणि बफर झोनमध्ये प्रवेश दिला जाईल. सात जानेवारीपासून नवे नियम लागू करण्यात येत आहेत.

प्रतिबंधक नियमानुसार पर्यटन
चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे नवे नियम लागू केलेत. यानुसार, यानुसार रायडर्सना मास्क वापरणे आवश्यक आहे. खरं तर ताडोबामध्ये एक ऑक्टोबर २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक नियमानुसार पर्यटनाला सुरुवात झाली. आता रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हे नवे नियम लागू करण्यात आल्याचं ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं.

मास्क नसल्यास एक हजार दंड
पर्यटक, गाईड, जिप्सी चालक या सर्वांसाठी हे नियम असतील. गेट व्यावस्थापक आणि कर्मचाऱ्यांनाही लसीकरण बंधनकारक आहे. एकाच कुटुंबातील सदस्य असलेल्या सहा लोकांनाच एकाचवेळी पर्यटन करता येईल. पण, एका कुटुंबातील नसलेल्या फक्त चारच जणांना पर्यटन करता येईल. मास्क न वापरल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

ताडोबातील वाघांमुळं संघर्ष
ताडोबातील वाघांमुळं मानव-प्राणी यांच्यातील संघर्ष दिसून येतो. इथं वाघांची संख्या वाढते. पण, आजूबाच्या गावातील लोकांवर हे वाघ हल्ले करतात. त्यामुळं मानवाचा वाघांसोबत संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष थांबविणे हे वनविभागापुढं फार मोठं आव्हान आहे. कधीकधी माणूस वाघांची कळत नकळत शिकार करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *