महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ जानेवारी । महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतोय. त्यातच पुण्यातही कोरोनाचा प्रचंड उद्रेक (outbreak of corona in Pune) होताना दिसतोय. पुण्यात सलग पाचव्या दिवशीही रेकॉर्ड ब्रेक कोरोना (record break corona) रूग्णवाढ झालेली पाहायला मिळतेय. पुण्यात दिवसभरात तब्बल 2 हजार 284 नवे कोरोनाबाधित (coronavirus) रुग्ण आढळले आहेत.
6 जानेवारीला दिवसभरात 2284 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात रुग्णांना 80 डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित 3 रुग्णांचा मृत्यू झाला तर पुण्याबाहेरील 01 असे काल दिवसभरात एकूण 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
106 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील एकूण रूग्णसंख्या 516787 वर पोहोचली आहे. तर सध्या पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 7 हजार 665 आहे. आतापर्यंत पुण्यात 9 हजार 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची 499991 असून गुरुवारी केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी संख्या ही 15775 इतकी आहे.
पुणे कोरोना रूग्णवाढ
1 जानेवारी 399
2 जानेवारी 526
3 जानेवारी 444
4 जानेवारी 1104
5 जानेवारी 1805
6 जानेवारी 2284
पुण्यातील नवे निर्बंध
पुण्यात मास्कशिवाय कुणी फिरताना दिसलं तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड आकारला जात आहे. तसेच कुणी मास्क नसताना थुंकताना दिसलं तर त्या व्यक्तीकडून थेट 100 रुपयांचा दंड घेतला जाईल, असं पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केलं. पुणे शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं.
‘दोन्ही लस घेतली असेल तरच परवानगी’
“मुंबई आणि पुण्यावर कोरोना संकट मोठ्या प्रमाणात आलं आहे. त्यामुळे पुण्यात आता उद्यापासून मास्क असेल तर 500 रुपये दंड आणि मास्क नसताना थुंकलात तर 1000 रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दोन्ही लस ज्याने घेतली नसेल तर कोणतीही हॉटेल, शासनाचे कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही. एवढ्या दिवसांपासून आम्ही आवाहन करुनही काही लोकं राहिलेली आहे. कारण जे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यापैकी 36 जणांनी लसच घेतली नसल्याचं समोर आलं आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं.
पुण्यात शाळा बंदचा निर्णय
कोरोनाबाधितांचा रुग्णसंख्या वाढल्याने पुण्यात प्रशासनाने शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. याआधी मुंबईत हा निर्णय घेण्यात आलाय. पुणे शहर हद्दीतील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय कोविड आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटच्या माध्यमातून माहिती देणार आहेत. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या हद्दीत 10 वी आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष बंद ठेऊन ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे.