महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ जानेवारी । गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Rates) चढउतार सुरू आहे. गुरुवारी सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली होती. मात्र जर आजच्या दराबद्दल बोललो, तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर, फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) 0.06 टक्क्यांची किंचित वाढ नोंदवली गेली आहे. तर चांदीचे भाव (Silver Price Today) 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
2020 बद्दल बोलायचे झाले ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर MCX वर 56,200 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च पातळी (Gold Rate on Record High) गाठली होती. आज एमसीएक्सवर सोन्याची वायदे किंमत 47,481 रुपये प्रति तोळाच्या पातळीवर आहे, म्हणजेच सोने आज सुमारे 8,719 रुपयांनी स्वस्त आहे.
फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत 0.06 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह आज 47,481 रुपये प्रति तोळा आहे. आजच्या व्यवहारात चांदी 0.04 टक्क्यांनी घसरली. या घसरणीनंतर आज सराफा बाजारात 1 किलो चांदीचा भाव 60,402 रुपये आहे.
महाराष्ट्रात सोन्याच्या दरात किरकोळ बदल (Gold Rate in Maharashtra) पाहायला मिळतो आहे. जाणून घ्या काय आहेत महत्त्वाच्या चार शहरातील सोन्या-चांदीचे दर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर
शहर आजचा दर (प्रति तोळा) कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई 48820 रुपये 48830 रुपये
पुणे 48650 रुपये 48660 रुपये
नाशिक 48650 रुपये 48660 रुपये
नागपूर 48820 रुपये 48830 रुपये
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
शहर आजचा दर (प्रति तोळा) कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई 46820रुपये 46830रुपये
पुणे 46130 रुपये 46140 रुपये
नाशिक 46130 रुपये 46140 रुपये
नागपूर 46820रुपये 46830रुपये
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर
शहर आजचा दर (प्रति किलो) कालचा दर (प्रति किलो)
मुंबई 60400 रुपये 60600 रुपये
पुणे 60400 रुपये 60600 रुपये
नाशिक 60400 रुपये 60600 रुपये
नागपूर 60400 रुपये 60600 रुपये
घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.