मतदान कार्ड नसले तरीही करु शकता वोट, आधार आणि पॅन कार्डसह 11 डॉक्यूमेंट्समधून कोणतेही एक आवश्यक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ जानेवारी । 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला आहे. अशा परिस्थितीत तुमचे मतदार कार्ड हरवले तरी तुम्हाला मतदान करण्यापासून रोखता येणार नाही. तुमचे मतदार कार्ड हरवले तरी तुम्ही मतदार कार्डाशिवाय मतदान करू शकता.

यासाठी मतदार यादीत फक्त तुमचे नाव असणे आवश्यक आहे. जर तुमचे नाव मतदार यादीत असेल आणि तुमच्याकडे मतदार कार्ड नसेल, तर निवडणूक आयोग इतर 11 प्रकारच्या कागदपत्रांना ओळखपत्र म्हणून मान्यता देते, जे दाखवून तुम्ही मतदान करू शकता.

वोटर लिस्टमध्ये असे तपासा आपले नाव

निवडणूक आयोगाची वेबसाइट Electoralsearch.in वर लॉगिन करा. येथे दोन प्रकारे वोटर लिस्टमध्ये आपले नाव सर्च करु शकता.
पहिल्या ऑप्शनमध्ये नाव, जन्मतारीख आणि काही इतर माहिती टाकून वोटर लिस्टमध्ये नाव तपासू शकता.
दुसर्या ऑप्शनमध्ये वोटर कार्डवर दिलेल्या EPIC नंबरच्या माध्यमातून माहिती मिळवू शकता.
EPIC नंबरला मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणतात. या नंबरच्या माध्यमातून मतदार सूचीमध्ये आपले नाव तपासू शकता.
माहिती मिळाल्यानंतर वोटर लिस्ट तुमच्या समोर खुली होईल आणि तुमचे डिटेल्स तिथे असतील.
सर्व माहिती देऊनही जर माहिती समोर येत नाही तर निवडणूक आयोग टोल फ्री नंबर 1800111950 वर कॉल करु शकता.
वोटर लिस्टमध्ये नाव असल्यास टाकू शकता वोट
जर तुमचे नाव वोटर लिस्टमध्ये असेल तर ज्या क्षेत्रातील मतदान यादीमध्ये तुमचे नाव आहे तेथील मतदान केंद्रावर टाकून वोट टाकू शकता. जर तुमचे मतदान कार्ट हरवले असेल तर या 11 कागदपत्रांमधून कोणतेही एक दाखवून तुम्ही मतदान करु शकता.

# पासपोर्ट
# ड्रायव्हिंग लायसेंस
# तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी असाल किंवा PSUs आणि Public Limited कंपनीमध्ये काम करत                असाल तर कंपनीच्या फोटो आयडीच्या आधारेही मतदान करता येते.
# PAN कार्ड
# आधार कार्ड
# पोस्ट ऑफिस आणि बँकेद्वारे जारी केलेले पासबूक
# MGNREGA जॉब कार्ड
# लेबर मिनिस्ट्री द्वारे जारी केलेले हेल्थ इंश्योरेंस कार्ड
# पेंशन कार्ड ज्यावर तुमचा फोटो लागलेला असेल आणि अटेस्टेड असेल
# नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर (NPR) द्वारे जारी स्मार्ट कार्ड
# खासदार किंवा आमदाराकडून जारी अधिकृत ओळखपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *