महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० जानेवारी । मुंबईत आज मुंबईकरांना खऱ्या अर्थाने गुलाबी थंडीचा अनुभव मिळतोय. गेले काही दिवसांपासून मुंबईत गारवा होताच. मात्र कालपासून चांगलीच थंडी पडायला सुरुवात झाली आहे. मुंबईत पारा 18 अंशांपर्यंत खाली घसरलाय. हा पारा आणखी 2-3 अंशांनी घसरण्याचा अंदाज आहे. या थंडीमुळे नागरिकांनी अनेक ठिकाणी शेकोटीचा आधार घेतलाय. रात्रपाळीला काम करणारे कर्मचारी, रस्त्यावर उभे असणारे रिक्षाचालक हे सर्वजण शेकोट्यांभोवती उभे राहून थंडी पळवण्याचा प्रयत्न करतायत.