Migrant Workers Mumbai : लॉकडाऊनच्या भीतीने मजुर वर्ग चिंतेत, मोठ्या प्रमाणात पुन्हा निघाले गावी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० जानेवारी । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत विशेष करून दिवसभरात 19 हजार ते 20 हजार कोरोना रुग्णांची संख्या मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आज मध्यरात्रीपासून कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या कडक निर्बंधांमुळे मुंबईच्या कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवासी मजुरांची हळूहळू गर्दी पाहायला मिळत आहे. कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करावे त्यासाठी मोठा संख्यामध्ये आरपीएफ पोलिसांचे बंदोबस्त लावण्यात आला आहे. आर पी एफ पोलीस लोकांना सातत्याने मेगा फोन च्या माध्यमातून आव्हान करत आहे की प्रवाशी कोरोना नियमांचे पालन करावे अन्यथा तुमचा व कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *