राज्यात ‘सरकारी कर्फ्यू’ जाहीर करावा, मनसेचे आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी कोरोनाच्या नवीन 3 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरज पडल्यास संपूर्ण राज्यात सरकारी कर्फ्यू जारी करावा, असे आवाहन सरकारला केले आहे.

राजू पाटील म्हणाले, “महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल,आणि जर जनतेला केलेले ‘स्वयंशिस्ती’चे आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात ‘सरकारी कर्फ्यू’ जाहीर करावा.”
महाराष्ट्राची #Italy होऊ द्यायची नसेल,आणि जर जनतेला केलेले ‘स्वयंशिस्ती’ चे आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा.

चीनमधील व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली आहे. तसेच, पाच जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यध्य राज ठाकरे यांनी कावल सोशल मीडियाद्वारे मनसेच्या कार्यकर्त्यांना कोरोनाबाबत विविध सूचना दिल्या आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केले तर हा रोग पसरणार नाही असे राज ठाकरेंनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *