महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ जानेवारी । सामान्य नागरिकांना वाढत्या महागाईमध्ये आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर ७ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ८७ डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावर पोहोचले आहेत. यापूर्वी जानेवारी, २०१४ मध्ये कच्च्या तेलाचे दर ८७ डॉलरच्या पुढे गेले होते. १ डिसेंबर, २०२१ रोजी कच्च्या तेलाचे दर ६८.८७ डॉलर प्रति बॅरल होते ते आता ८७ डॉलरवर पोहोचले आहेत. दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात २६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रमुख शहरांमधील
दर (रुपये/लिटर)
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई १०९.९८ ९४.१४
दिल्ली ९५.४१ ८६.६७
चेन्नई १०१.४० ९१.४४
भोपाळ १०७.२३ ९०.८७
असा आहे कर (₹)
पेट्रोल/लिटर डिझेल/लिटर
मूळ किंमत ४७.९८ ४९.३३
भाडे ०.२५ ०.२८
केंद्र सरकारचा कर २७.९० २१.८०
डिलर कमिशन ३.७८ २.५८
राज्याचा कर १५.५० १२.६८
एकूण किंमत ९५.४१ ८६.६७
(आकडे दिल्लीतील पेट्रोल डिझेलच्या किमतीनुसार)
सध्या जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. याच्यासह मध्य पूर्वमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी संयुक्त अरब अमिरातीमधील विमानतळावर ड्रोन हल्ल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. यामुळे तेलाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.