ई-वाहन निर्मितीसाठी 1 हजार कोटींची गुंतवणूक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ जानेवारी । बजाज ऑटो कंपनीने इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीला चालना देण्याचे धोरण अवलंबले आहे. या उद्देशाने कंपनी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टीव्ह योजनेअंतर्गत (पीएलआय) 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सध्या कंपनीने पीएलआय योजनेसाठी अर्ज केला असून पुढील पाच वर्षांत 1 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे उद्दीष्ट आहे. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीने आपल्या ईलेक्ट्रीक टू-व्हीलर चेतकच्या जवळपास 2 हजार युनिट्सची विक्री केली आहे. तसेच जवळपास 10 हजार चेतकची ऑर्डरही नोंदवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *