Aadhar Card PVC : आधार कार्डचं नवीन रूप पाहिलंत का ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ जानेवारी । सध्या आपल्या बहुसंख्य जणांकडे जे आहे, ते नॉर्मल आधार कार्ड. ज्याची प्रिंट आऊट नॉर्मल कागदावर घेतलेली आहे. ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याला लॅमिनेटही करतो. पण, काही दिवसांनी ते खराब व्हायला लागतं. कारण आधार कार्डचा वापरच तेवढ्या प्रमाणात होतो. बहुसंख्य कामासाठी ते वापरलं जातं.

पण, आता मी तुम्हाला जर सांगितलं की, जसं आपलं एटीएम किंवा पॅन कार्ड प्लास्टिक स्वरूपात मिळतं, तसंच आधार कार्डही मिळणार आहे, तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.

UIDAI नं म्हणजेच ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’नं आधार कार्ड एका नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
‘आधार पीव्हीसी कार्ड’ असं या नव्या स्वरूपाचं नाव आहे. त्यामुळे आता आधार कार्डवरील माहिती पीव्हीसी म्हणजेच polyvinyl chloride कार्डवर प्रिंट करून मिळणार आहे.

आधार पीव्हीसी कार्डाविषयी माहिती देताना UIDAI नं म्हटलंय, “या कार्डाची प्रिटिंग क्वालिटी चांगली असते आणि ते अधिक काळ टिकतं. शिवाय पावसामुळेही ते खराब होत नाही. यावर क्यूआर कोड असल्यामुळे ऑफलाईन व्हेरिफिकेशनही होऊ शकणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *