महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ जानेवारी । राज्यभरात अचानक पाऊस पडल्याने हवेत गारव निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसभात राज्यभरात किमान तापमान कमी होऊन थंडी (Maharashtra Weather Forecast) वाढण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं (IMD) अंदाज व्यक्त केला आहे. तसेच मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान व गुजरात येथील धूलीकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठय़ा प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या दहा वर्षांतील मुंबईत सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली. सहा ते सात अंशानी कमाल तापमानात घट झाली होती. मुंबईसह राज्यभरात अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कमी झालेली थंडी अचानक वाढणार आहे. येत्या दोन दिवसात राज्यभरात किमान तापमान कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवण्यात आली आहे.
आज किमान तापमानात घट होऊन पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात सर्वाधिक थंडी जाणवेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं जारी केला आहे. तसेच काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात १४ डिग्रीच्या खाली तापमान घसरण्याची शक्यता आहे.