महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी गॅझेट उपलब्ध करून द्यावे ; आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । पिंपरी चिंचवड मनपा शाळेमध्ये शिक्षण घेणारी मुले ही अत्यंत गरीब कुटुंबातील असुन हातावर पोट असणारे नागरिक आपल्या मुलांना मनपा शाळेत शिक्षण देतात, परिस्थिती हलाकीची असल्याने या पाल्यांचे पालक टॅब / गॅझेट किंवा ॲन्ड्रॉइड मोबाईल अशी साधने घेऊ शकत नाहीत. पालकांची हिच गैरसोय लक्षात घेऊन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी यांनी पुढाकार घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वापरा करिता व ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी गॅझेट उपलब्ध करून द्यावे उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.

 

राज्यात मार्च-२०२० पासून करोना (COVID-19) संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने राज्यातील शाळा ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. ई-लर्निग तसेच ऑनलाईन शिक्षण ही काळजी गरज झाली आहे. शिक्षक आणि मुले देखील ह्या नवीन शिक्षण पद्धतीला आवडीने आत्मसाद करून, आपल्या दैनदिन जीवनाचा भाग बनवू पाहत आहेत. ह्याकरिता आवश्यक असणाऱ्या प्रकारच्या जसे संगणक, मोबाईल, टॅब किंवा गॅझेट अशा प्रकारच्या डिजिटल साहित्याचा वापर करण्यात मुले पारंगत झाली आहेत.

 

सध्य स्थितीतील कोवीड-१९ सदृष परिस्थिती विचारात घेता व तसेच पुन्हा इतर राज्यामध्ये व देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे म्हणून नजीकच्या काळात इयत्ता १ ते १० वीच्या शाळेतील महानगरपालिका अंतर्गत येणार्याद विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यार्थांना तसेच शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना सन २०२१-२२ या वर्षात ऑनलाईन /ऑफलाईन शिक्षण देण्याकरिता अद्यावत तंत्रज्ञान असलेले नवीन प्रचलित आवृतीचे टॅब खरेदी करून शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावणे गरजेचे आहे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणप्रणाली वापरण्याकरिता टॅब अथवा गॅझेट उपलब्ध करून देण्यासाठी शासन नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, व याबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी निवेदनात केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *