जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया भारतीय संविधान : आमदार महेश लांडगे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । इंग्रजांच्या जोखडातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झाल्यानंतर स्वतंत्र भारताने २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार केला. प्रजेची सत्ता स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान स्वीकारल्यामुळे संपूर्ण जगात भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जावू लागले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा पाया भारतीय संविधान आहे. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्त्व अधोरेखित करतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचे स्मरण अन् अभिवादन करतो, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने मोरवाडी येथील पक्ष कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, नवनगर विकास प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, बाबू नायर, महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, सुप्रिया चांदगुडे, सुर्यकांत गोफणे, महादेव कवितके, वैशाली खाड्ये, देवदत्त लांडे, राजेंद्र ढवळे,निखील काळकूटे, संजय पटनी, संजय परळीकर, नीलम हुले, कैलास सानप, तेजस्विनी कदम, हेमंत देवकुळे, किरण पाटील, संजय शेंडगे, हिना मुलाणी, पूजा आल्हाट, अंजली पांडे, दिपाली कारंजकर, कोमल शिंदे, कविता करदास, सुनील कदम, प्रदीप बेंद्रे, फारूक इनामदार, अभिजित भलशंकर आदी उपस्थित होते.

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. अनेकांच्या बलीदानातून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. २६ जानेवारी १९५० रोजी खऱ्या अर्थाने भारत लोकशाही राष्ट्र बनले. हे दोन्ही दिवस भारतवासीय राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतात. देशाच्या प्रजासत्ताक दिनी पिंपरी-चिंचवडसह देशवासीयांना शुभेच्छा देतो, असेही महापौर ढोरे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *