लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत (Lata Mangeshkar Health Update) मोठी माहिती समोर येत आहे. मंगेशकर कुटुंबियांनी लता दीदींच्या प्रकृतीबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. लता दीदींच्या प्रकृतीत सुधार होत आहे. लता दीदींना काही दिवसांपूर्वी 9 जानेवारीला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (lata mangeshkar health update today 27 january 2022 legendary singer shows signs of improvement and her take off the ventilator)

“लता दीदींवर आयीसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. लता दीदींना आज (27 जानेवारी) सकाळी व्हेंटिलेटरमधून बाहेर काढण्यात आलं त्यानंतर एक्सट्यूबेशन टेस्ट (extubation test) करण्यात आली. दीदींच्या प्रकृतीत सुधार होत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात डॉक्टरांचं पथक लक्ष देऊन आहे”, असं या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

लता दीदींची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी, त्या ठणठणीत होऊन परताव्यात यासाठी संपूर्ण देशातून पार्थना करण्यात येत आहे. देशातील बऱ्याच ठिकाणी होम-हवन केलं जातं आहे. या सर्व प्राथनांसाठी आणि शुभेच्छांसाठी मंगेशकर कुटुंबियांनी प्रत्येकाचे आभारही मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *