Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
महाराष्ट्र मास्क मुक्त होणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क संदर्भात झाली चर्चा - Maharashtra 24

महाराष्ट्र मास्क मुक्त होणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क संदर्भात झाली चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । गेली दोन वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या महाभंयकर संकटाचा सामना करतोय. कोरोना महामारीच्याविरोधात लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. त्याबरोबरच मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं या सारख्या नियमांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं जात आहे.

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मास्कपासून सुटका होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मास्कसंदर्भात चर्चा करण्यात आली.

मास्कसंदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा केली जाणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण जाहीर केलं जाणार आहे. अनेक देशांमध्ये जनता मास्कच्या निर्बंधातून मुक्त झाली आहे.

या देशांत मास्कपासून सुटका
सध्या जगात ब्रिटन, अमेरिका, न्यूझीलंड, हंगेरी या देशांमध्ये मास्कचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *