12 राज्यांत पुन्हा शाळा सुरू होणार, अनेक राज्यांत बालवर्गही भरणार; कोरोना ओसरू लागताच निर्बंधही हळूहळू मागे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ फेब्रुवारी । देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटते आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्येत ६५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये जानेवारीपासून बंद असलेल्या शाळा मंगळवार,१ फेब्रुवारापासून पुन्हा सुरु होत आहेत. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक ठिकाणी चिमुकल्यांसाठीचे प्राथमिक शाळेचे वर्गही सुरु होणार आहेत. कोविड लसीकरणाचे राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष एन.के. अरोरा यांच्या मते,मोठ्या माणसांइतकाच मुलांनाही कोरोना संसर्गाचा धोका आहे परंतु त्यांना गंभीर आजाराची भीती मात्र अजिबात नाही.

मध्य प्रदेश 2.34% 1 ते 12 वीपर्यंतचे वर्ग 50% क्षमतेने भरणार निवासी शाळा, वसतिगृहेही 50% क्षमतेने उघडणार
राजस्थान 24.15% 10वी, 11वी, 12वी वर्ग भरणार. 6 वी ते 9वी चे वर्ग 10 फेब्रु.पासून ऑनलाइन पर्यायही उपलब्ध असेल.
हरियाणा 36.71% 10वी, 11वी, 12वी चे शासकीय शाळांचे वर्ग उघडणार ऑनलाइन शाळेचा पर्यायही उपलब्ध
हिमाचल 40.04% 9वी, 11वी, 12वी चे वर्ग सुरू होणार
उत्तराखंड 34.51% सध्या फक्त 10, 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू होणार
कर्नाटक 15.54% सर्व शाळा-महाविद्यालये ३१ जानेवारीपासून सुरू
तामिळनाडू 4.42% 1 ते 12 वीचे वर्ग भरणार, महाविद्यालयेही सुरू होणार प्ले स्कूल, प्राथमिक शाळा सध्या बंदच राहणार.
तेलंगण 3.32% सर्व शासकीय शाळा,महाविद्यालये सुरू होणार
महाराष्ट्र 32.07% औरंगाबाद ग्रामीण भागात 1 ते 7 वर्ग सुरू होणार पुणे येथे
1 ते 8 वी अर्धी शाळा, मुंबईत 24 फेब्रुवारीपासून
प. बंगाल 54.76% 3 फेब्रुवारीपासून 8 ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार
त्रिपुरा 65.91% बालवाडी ते 12वी पर्यंत शाळा, ३१ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत.

कोरोना रुग्णसंख्येची सात दिवसांची सरासरी
या राज्यांत अद्याप निर्णय नाही: उत्तर प्रदेश – बिहारमध्ये शाळा- कॉलेज 6 फेब्रु.पर्यंत बंद आहेत. याबाबत 5 फेब्रुवारीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. दिल्लीत शाळा-कॉलेज पुढील आदेश येईपर्यंत बंद असतील, तर इतर राज्यांत संघटना शाळा उघडण्याची मागणी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *