महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । तुम्हाला सोने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही (Gold Silver Price) वाढ झाली. शुक्रवारी सोने 94 रुपयांनी महागले आणि तो 48273 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. याआधी गुरुवारी सोन्याचा भाव 48179 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदी 212 रुपयांनी महागून 60927 रुपये प्रति किलोवर बंद झाली. गुरुवारी चांदीचा भाव 60715 प्रति किलोवर बंद झाला. (Check Today’s Gold Silver Price Updates)
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीन किंमत
आज 24 कॅरेट सोन्याचा दर 48273 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोन्याचा दर 48080 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर 44218 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याचा दर 36205 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 36205 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मेटल- 4 फेब्रुवारीचे दर (रु. / 10 ग्रॅम)- 3 फेब्रुवारीचे दर (रु. / 10 ग्रॅम)- दरामध्ये बदल (रु./10 ग्रॅम)
– सोने 999 (24 कॅरेट)- 48273- 48179 – (+94)
– सोने 995 (23 कॅरेट)- 48080- 47986- (+94)
– सोने 916 (22 कॅरेट)- 44218- 44132- (+ 86)
– सोने 750 (18 कॅरेट)- 36205- 36134 -(+71)
– सोने 585 (14 कॅरेट)- 28240- 28185-(+55)
– चांदी 999- 60927- 60715- (+212)
मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे सोन्याची नवीन किंमत (Latest price of gold) जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासह, वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी तुम्ही www.Ibja.Co ला भेट देऊ शकता.