महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । भाजपचे आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज राणेंना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना जामीन मंजूर होणार की नाही, याकडे लक्ष्य लागलं आहे. (Nitesh Rane arrest) दरम्यान, मंत्री नारायण राणे दिल्लीतील संसदीय अधिवेशनातून थेट सिंधुदूर्गमध्ये दाखल झाले आहेत.
तीन दिवसांपूर्वी नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण आले होते. यानंतर त्यांनी न्यायालयीन कोठडीसाठी मागणी केली. मात्र, संतोष परब हल्ल्यात चौकशी सुरू असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. यानंतर न्यायालयाने राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.