U19 World Cup Final : इंग्लंडने जिंकला टॉस, भारताची पहिल्यांदा गोलंदाजी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । U19 World Cup Final : अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने आतापर्यंत चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडिया ज्या पद्धतीने वर्ल्डकपमध्ये खेळत आहे, ते पाहता टीम इंडियाला पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकणं अवघड नाही.

दुसरीकडे, इंग्लंडही उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून दोन्ही संघांमधील हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. इंग्लंड 1998 चा चॅम्पियन आहे. हा सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम एटिंगा येथे खेळवला जात आहे.

भारताचा संघ :
आंगकृष्ण रघुवंशी, हरनूर सिंग, शेख रशीद, यश धुल (कर्णधार), निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना (विकेटकीपर), राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, रवी कुमार.

इंग्लंडचा संघ :
जॉर्ज थॉमस, जेकब बेथेल, टॉम पर्स्ट (कर्णधार), जेम्स रेव्ह, विल्यम लक्सटन, जॉर्ज बेल, रेहान अहमद, अॅलेक्स हॉर्टन (विकेटकीपर), जेम्स सेल्स, थॉमस ऍस्पिनवॉल, जोशुआ बॉयडेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *