महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . 6 फेब्रुवारी । स्वरकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) ह्या केवळ भारतातील नव्हे तर जगामधील सुप्रसिध्द आणि अद्वितीय अशा गायीका होत्या. त्यांच्या आवाजाने केवळ भारतीयांवरच नव्हें तर परदेशातील लोकांवरती देखील मोहिणी घातली होती.
लतादीदींचं (Lata Mangeshkar) जाण म्हणजे देशासह जगभारातील संगीत क्षेत्राचं मोठ नुकसान करणार आहे. त्यांच्याबद्दल आता अनेक प्रकारची माहिती तुम्हाला उपलब्ध होईल मात्र ही गोष्ट आहे ती म्हणजे १९८९ च्या जागतिक मराठी परिषदेमधील ज्यावेळी व्यासपीठावरती प्रत्येक क्षेत्रातले दिग्गज उपस्थित होते. देशाच्या राजकारणातील वरिष्ठ आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार, (Sharad Pawar) मनोहर जोशी, आणि व्यापिठावरती भाषण करत होते खुद्द पु.ल. देशपांडे (P L Deshpande) आणि पुलंचे भाषण म्हणजे एक शब्दप्रेमींसाठी मेजवानीच असते यावेळी बोलताना पुलं म्हणाले होते.
‘मला जर एखाद्यांने विचारलं की, आकाशात देव आहे का ?’ तर मी सांगेन देव आहे की नाही मला माहित नाही. मात्र ह्या आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि ‘लताचा स्वर’ आहे. असं सांगेन’ पुलंनी असं म्हणताच सभागृहात उपस्थितांनी एकच टाळ्यांचा कडकडाड केला. पुलं पुढं म्हणाले, ‘दिवस रात्र अशी कुठलीही वेळ नाही, क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठे जात असतो.’ असं वर्णन पुलंनी लतादीदींचे केल होतं आणि आजही ते वर्णन लतादीदींना लागू होत.
https://www.facebook.com/watch/?v=2111712128965023