टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची भारतात चाचणी, भारतीय बाजारात लवकरच होणार लॉंच?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ फेब्रुवारी । जागतिक स्तरावर भारतीय कार बाजार खूप चांगला मानला जातो. त्यामुळे इलेक्ट्रिक कार बनवण्यात अग्रेसर असलेली टेस्ला देखील त्यांच्या इलेक्ट्रिक कार भारताच्या बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे. टेस्ला त्यांची दोन सर्वात स्वस्त मॉडेल 3 आणि मॉडेल Y या कार भारतात आणण्याच्या प्रयत्नात आहे.

टेस्लाच्या मॉडेल Y ची भारतात नुकतीच चाचणी करण्यात आली आहे. भारतात करण्यात आलेल्या चाचणीचे फोटो टेस्ला क्लब इंडियाच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेली टेस्लाच्या Y मॉडेलच्या कारवर पिंपरी-चिंचवडचा पासिंग क्रमांक (MH-14) पाहायला मिळाला.

टेस्ला मॉडेल Y लाँग रेंज AWD आणि परफॉर्मन्स या दोन पर्यायांमध्ये जागतिक स्तरावर लॉंच करण्यात आले आहेत. ही दोन्ही मॉडेल्स ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्ससह येतात. प्रत्येक एक्सलसाठी एक इलेक्ट्रिक ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) फंक्शन देतात. यात समोर स्वीप्टबॅक हेडलॅम्प विना ग्रिल आणि सेंटर एअरडॅम डिझाइन आहे. यात फ्रंट सेक्शन आणि एलईडी टेललाइट्स देखील मिळतात. मागील बाजूस याला एक धारदार दिसणारे बूट झाकण आणि क्लॅडेड रिअर बंपर मिळते.

मॉडेल Y ची किंमत किती आहे?
टेस्लाच्या या कारची किंमत अंदाजे 60 लाख रुपये आहे. टेस्ला आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवरील कर कमी करण्यासाठी भारत सरकारशी बोलणी करत आहे. परंतु, कंपनी आणि सरकारमध्ये समन्वय नाही. भारत सरकार कर कमी करण्यास तयार नसून टेस्लाने आपल्या कार भारतातच बनवाव्यात अशी सरकारची इच्छा आहे.

टेस्लाची ही कार 4.8 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0-97 किमी प्रतितास वेगाने धावते. या इलेक्ट्रिक कारची रेंज 480 किलोमीटर असून त्यामध्ये लाँग रेंजचा पर्याय देखील देण्यात आला आहे. यात कंपनीने 525 किलोमीटरच्या रेंजचा दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *