सोन्याच्या किमतीत वाढ ; जाणून घ्या आजचा कमॉडिटी बाजारातला दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी । आर्थिक अनिश्चितता आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी कमॉडिटी बाजारात तेजी दिसून आली. आज सोने २५० रुपयांनी महागले आणि चांदीमध्ये ९०० रुपयांची वाढ झाली.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८११९ रुपये इतका आहे. त्यात १९५ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोन्याने आजच्या सत्रात ४८२०९ रुपयांचा स्तर गाठला होता. आज एक किलो चांदीचा भाव ६१७४५ रुपये इतका आहे. त्यात ८९६ रुपयांची वाढ झाली आहे.

याआधी शुक्रवारी बाजार बंद होताना १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७९४८ रुपये इतका होता. त्यात ३१ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७७०२ रुपये इतका खाली आला होता. एक किलो चांदीचा भाव ६०८५२ रुपये इतका आहे. चांदीमध्ये १२० रुपयांची वाढ झाली. गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीला नफावसुलीचा फटका बसला होता. सोने जवळपास ७०० रुपयांनी तर चांदीमध्ये एक हजारांची घसरण झाली होती.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५२०० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४९२५० रुपये इतका आहे. त्यात ५० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५२०० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ४९३०० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५३९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९५२० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५२०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१५० रुपये इतका आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोन्याचा भाव १८१०.३८ डॉलर प्रती औंस इतका वाढला. त्यात ०.२ टक्के वाढ झाली. चांदीचा भाव २२.६७ डॉलर प्रती औंस झाला. त्यात ०.९ टक्के वाढ झाली. नजीकच्या काळात होणाऱ्या व्याजदर वाढीचा अंदाज घेतला तर सोने १८५५ डॉलरपर्यंत वाढू शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *