‘या’ संघाने दिली रहाणेला पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ फेब्रुवारी । इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या सिझनच्या मेगा लिलावाचा आज दुसरा दिवस आहे. शनिवारी पहिल्या दिवशी झालेल्या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावण्यात आली. तर आजंही काही मोठ्या खेळाडूंवर बोली लागली तर काही अनसोल्ड राहिलेत. यामध्ये भारताचा खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा अनसोल्ड राहिलेत. तर अजिंक्य रहाणे कोलकाताच्या ताफ्यात सामील झालाय.

दुसऱ्या दिवशी मेगा लिलावात काही खेळाडू अनुभवी देखील आहेत. ज्यामध्ये भारताचा महान फलंदाज अजिंक्य रहाणेचं नाव होतं. रहाणेला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. पण लिलावात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

आयपीएलच्या लिलावात अगदी शेवटच्या क्षणी, कोलकाता नाइट रायडर्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील केलं. अजिंक्य रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सने 1 कोटी रुपयांना विकत घेतलंय. त्यामुळे आता रहाणे केकेआरकडून खेळाताना दिसणार आहे.

याआधी दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळलेल्या रहाणेची 1 कोटी ही मूळ किंमत होती. अजिंक्य रहाणेने राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपदही भूषवलं होतं. मात्र आता खराब फॉर्ममुळे रहाणेला आयपीएलमध्ये फक्त 1 कोटी रूपयांची बोली लागली आहे.

दरम्यान टीम इंडियाचा गलांदाज इशांत शर्माला कोणत्याही टीमने विकत घेतलेलं नाही. इशांत शर्माही खराब फॉर्ममध्ये असून टीम इंडियातील त्याच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. त्यामुळे आता आयपीएलमध्ये कोणीही खरेदीदार मिळाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *