झोपल्यानंतर घोरता का ? ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । झोपल्यानंतर घशातील नसा कंप पावतात आणि आवाज करू लागतात, तेव्हा घोरण्याची प्रक्रिया सुरू होते. रात्रीच्या शांततेत घोरण्याच्या आवाजामुळे इतरांची झोपमोड होतेच, मात्र घोरणाऱ्या व्यक्तिला याची जाणीव असतेच असे नाही. घोरणे ही सर्वसामान्य समस्या असली, तरी अति घोरणाऱ्या व्यक्तिने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, त्यापूर्वी यावर काही घरगुती उपायही करता येऊ शकतात.

पेपरमिंट
एक ग्लास पाण्यात पेपरमिंट ऑइलचे एक किंवा दोन थेंब मिसळा आणि झोपण्यापूर्वी या पाण्याने गुळण्या करा. जोपर्यंत तुम्हाला योग्य परिणाम मिळत नाही तोपर्यंत हे दररोज करा. यामुळे श्वासनलिका मोकळी व्हायला मदत होईल आणि घोरणे बंद होईल.

ऑलिव तेल
घोरणे थांबवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा नियमित वापर करा. यासाठी अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडे मध मिसळा. रोज झोपण्यापूर्वी याचे सेवन करा. ऑलिव्ह ऑइल सर्व श्वसनमार्गाच्या ऊतींना शांत करते. तसेच यामुळे शरीराचा थकवा आणि वेदना कमी होऊ शकतात.

वेलची
वेलचीमुळे कफ आणि सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते. घोरण्यावर फायदा होतो. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा वेलची पावडर मिसळा. झोपण्याच्या 30 मिनिटे आधी प्या. दररोज हा उपाय केल्यास घोरणे हळूहळू कमी होऊ शकते.

मध
मधाच्या सेवनाने सर्दी-खोकल्यासह अनेक समस्यांपासून सुटका मिळते. मध घोरणे रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून रोज झोपण्यापूर्वी प्या. याशिवाय कॅमोमाइल टी किंवा ग्रीन टी सारख्या हर्बल टीला गोड करण्यासाठी मध वापरू शकता. मधाच्या वापराने घोरणे कमी होईल.

लसूण
घोरण्याच्या समस्येवर लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाचं सेवन केल्यामुळे घोरण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत दोन तीन लसूण खा.

पुदिना
पुदिना पाण्यामध्ये उकळा त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्याने गुळण्या करा. हे पाणी प्यायला तरी याचा खूप फायदा होतो. त्यामुळे रोज रात्री हा उपाय केल्यास काही दिवसांनी घोरण्याची समस्या कमी व्हायला मदत होईल.

वेलची पावडर
रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलची पावडर टाकून ते पाणी प्या. यामुळे घोरणे कमी होऊ शकते.

देशी तूप
श्वसनमार्ग मोकळा नसल्यास घोरण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी देशी तूप जरा कोमट गरम करा आणि ते नाकात टाका. यामुळे घोरण्याची समस्या कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *