Gold Price Today: आज पुन्हा सोने दर रेकॉर्ड स्तराजवळ, खरेदीआधी तपासा लेटेस्ट भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । सोने दरात तेजी (Gold Price Today) पाहायला मिळत आहे. जर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर लवकर खरेदी करा. कारण जाणकारांनुसार 2022 मध्ये सोन्याचे दर (Gold Price) 52000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकतात असा अंदाज आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज गोल्ड 0.76 टक्क्यांच्या मोठ्या तेजीसह ट्रेड करत आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज वाढ झाली आहे.एप्रिल डिलीवरी सोन्याचा दर आज 0.76 टक्क्यांच्या वाढीसह 50,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 1.10 टक्क्यांनी वधारला आहे. या वाढीसह चांदीचा दर 64,289 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

5740 रुपये स्वस्त सोनं –
ऑगस्ट 2020 मध्ये मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX वर एप्रिल वायदे भाव 50,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्यावर्षीच्या उच्चांकापेक्षा सोनं आज 5740 रुपयांनी स्वस्त आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *