महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे आज संत श्री गजानन महाराज यांच्या 144 व्या प्रगटदिन सोहळ्यानिमित्त पार पडतोय शेगाव नगरीत प्रगटदिन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत.या वेळी मंदिरात ऑनलाईन पास, ओळखपत्र पाहूनच दिला जातोय प्रवेश. अनेकांची तपासणी केली जात आहे. यावेळी कोवीडचे नियमांची काटेकोरपण अंमलबजावणी होत आहे.
150 हुन अधिक दिंडी आज प्रगटदिना निमित्त शेगाव मध्ये दाखल झाल्या आहेत. सर्वाकडे चैतंन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मोठी काळजी या ठिकाणी घेतली जात आहे.
‘गण गण गणात बोते’चा (Gan Gan Ganat Bote) गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. 23 फेब्रुवारी 1878 (23 February day special) रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज (Gajanan Maharaj) दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले.
गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. ते ‘गण गण गणात बोते’, हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत.